संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
सेवानिवृत्त संघटनेची पेंशन अदालतीचे १६ आॕक्टोबर रोजी आयोजन
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : म. रा. सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी व अधिकारी संघटनेने मागणी केल्यानुसार जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीने सेवानिवृत्तांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी दि.१६/१०/२५ रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे.
ज्या ज्या सेवानिवृत्तांच्या ज्या समस्या असतील त्या लेखी निवेदनासह स्वतः हजर रहावे. निवेदनाची एक प्रत संघटनेकडे द्यावी. प्रसंगी सर्व खातेप्रमुख हजर राहणार आहेत. सेवानिवृत्तांना वर्ष वर्ष रकमा मिळत नाही. यात उपदान, अंशराशीकरण, भविष्य निवाह निधी, गटविमा, सातव्या आयोगाचे काहींचे हप्ते, थकीत देयके देण्यात यावे. जिल्हा आदर्श शिक्षक वेतनवाढ याचिका धारकांना आणि उत्कृष्ट कार्याच्या आगाऊ वेतनवाढ याचिका धारकांना मा उच्च न्यायालयाच्या निकालानुसार वेतनवाढीचे आदेश त्वरीत देण्यात यावे. संगणक वसुलीला शासनाने स्थगीती दिलेली असतांनाही जिल्हा परिषदेने कपात केलेली अथवा चलनाद्वारे भरणा करण्यास भाग पाडलेली रक्कम परत करण्यात यावी. तसेच पेंशन विक्री रकमेची वसुली परतफेड झाल्यावर थांबविण्यात यावी. ८० वर्षे वय झालेल्या जेष्ठांच्या मुळ वेतनात नियमाप्रमाणे वाढ करण्यात यावी. याशिवाय ज्यांच्या ज्या समस्या असतील. त्याच्या निवेदनासह सर्वांनी हजर रहावे. असे सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तात्याराव चव्हाण कचनेरकर, कार्याध्यक्ष सी.एम.रमणे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र जोशी, जिल्हा उपाध्यक्ष के.एम.फासाटे, राज्य नेते एम.यु. हारदे, सुभाष शिंदे, विभागीय सचिव गणेश राठोड, जि. सचिव जी.एन. घुगे व एस.जी.बढे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव बोरुडे, प्रभाकर गोर्डे, सल्लागार अजहर फारुकी, एम.एम. शेख, एन.आर. फाळके, बी.बी. सोनवणे, बी. जी.सोनवणे, बी.जी. देवकर, बी. टी.काळे, आर.पी.चव्हाण, वसंत ताकटे, बजरंग काळे, अशोक येवले, दिगंबर जाधव, धर्मा चव्हाण, विलास शेहरे, एस.व्ही.केदारे, बी.का. नलावडे, आर. एल. पाटील, एस. बी. वाकळे, मदनसिंग कोल्हेकर, श्रीमती ललिताताई मगरे जिल्हा महिला आघाडी प्रमुख यांनी कळवले आहे.