संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
प्रतिनिधी दि.16 रोजी ट्वेंटीवन शुगर लि. देवीनगर, सायखेडाच्या वतीने मराठवाडा ऊस रोपवाटिका, गाडे पिंपळगाव ता.परळी वै.जि. बीड येथे भेट देण्यात आली. या ट्वेंटीवन शुगर, सायखेडा चे मुख्य शेतकी अधिकारी अधिकारी श्री.गडदे साहेब,ऊस विकास अधिकारी श्री.येळकर साहेब, सिरसाळा विभाग अधिकारी श्री.सोळंके साहेब तसेच मा.समाज कल्याण सभापती प्रभाकर वाघमोडे व इतर स्थानिक शेतकरी बांधवांनी मराठवाडा ऊस रोपवाटिकेला भेट दिली.
उसाच्या विविध व्हरायट्यांची,नर्सरी चालणाऱ्या कामाची, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती घेऊन चर्चा करून आनंद व्यक्त केला. व परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना निरोगी पायाभूत दर्जेदार रोपे द्यावी अशा सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी ते जुने बेणे न वापरता नवीन पायाभूत जातींची रोप लागवडीचा अवलंब करून लागवड करावी आणि आपल्या उत्पादनामध्ये भरगोस वाढ करावी असे या ठिकाणाहून शेतकऱ्यांना आवाहन केले. शेतकऱ्यांना रोप लागवडीमध्ये येणारे अडचणी जाणून शेतकऱ्यांची योग्य वेळी मदत मराठवाडा उस रोपवाटिकेच्या माध्यमातून केली जाईल असे देखील आवाहन रोपवाटिका व्यवस्थापकांनी केले.