संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पैठण- विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल & ज्युनिअर कॉलेज येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक श्री. शाम उदावंत व युवाचार्य प्रसाद जाधव, विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. संतोष पा. तांबे, प्राचार्य आर.बी. रामावत, मुख्याध्यापिका एम. के. कोळगे यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.
यावेळी योग प्रशिक्षक शाम उदावंत, प्रशिक्षक युवाचार्य प्रसाद जाधव यांनी विद्यार्थ्यांकडून व शिक्षकांकडून कपाल भारती, ताडासन, वज्रासन, त्रिकोणासन, अनुलोम- विलोम, सुखासन, वृक्षासन, शशांकासन, प्राणायाम, नाडीशोधन, पवनमुक्तासन अशाप्रकारचे विविध योगासने करून घेतली. तसेच मानवी जीवनात योगासनाचे महत्त्व समजावून सांगितले. नियमित योगासने केल्याने शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल & ज्युनिअर कॉलेजच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या व ज्युनिअर कॉलेजच्या सर्वच शिक्षकांनी मेहनत घेतली.