संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या बैठकीत परभणी येथील ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांची संस्कृती सेवाभावी संस्था, परभणी, आयोजित पहिल्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
हे पहिले राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन वसमत, जिल्हा हिंगोली येथे दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे, असे संस्थेचे अध्यक्ष किरण खंदारे यांनी सांगितले. या बैठकीस संस्थेचे सचिव सिद्धार्थ कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते. समितीच्या बैठकीत श्री राजेंद्र गहाळ यांची संमेलनाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राजेंद्र गहाळ परभणी येथील महात्मा फुले विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कोंडी, दोन एकर, पोशिंदा कथासंग्रह प्रकाशित आहेत. विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कथाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांच्या लेखनास अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यापूर्वी त्यांनी विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. शाळा, महाविद्यालय, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बहारदार कथाकथनाचे शेकडो कार्यक्रम संपन्न झाले आहे.
गहाळ यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. विजयराव गव्हाणे, उपाध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ ॲड. अशोक सोनी, सचिव दादासाहेब देशमुख, सहसचिव अजयराव गव्हाणे, दादासाहेब नाईकवाडे, प्राचार्य तुळशीराम वानरे, मुख्याध्यापक कैलासराव लोनसने, लखनसिंह जाधव, रमेशराव नाईकवाडे, लखनसिंह जाधव, शिवाजी विरसे, प्रदीप चव्हाण, नामदेव चापके आदीसह सर्व मित्रपरिवाराकडून अभिनंदन होत आहे.