संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय डोणगाव शाळेमध्ये "लिहिते व्हा" या उपक्रमांतर्गत कवी श्री लक्ष्मण खेडकर सर यांचा "कवी लेखक आपल्या भेटीला" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता .शिक्षणाधिकारी मा. जयश्री चव्हाण मॅडम यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बाल महोत्सव आणि बालसाहित्य संमेलन आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी मा. केदार साहेब (पैठण )व बालानगर केंद्राचे केंद्र प्रमुख मा नाचन सरांच्या मार्गदर्शनाखाली बालमहोत्सव आणि बालसाहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून कवी लक्ष्मण खेडकर यांनी डोणगाव शाळेत भेट देऊन त्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या काही कविता ही विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या.
विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कलागुण दडलेले असतात; या कलागुणांना वाव देण्याचे व तुमच्यातुनच कवी ,लेखक चित्रकार घडू शकतो हे विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणाद्वारे पटवून दिले. कार्यक्रमांमध्ये उदयोन्मुख कवी लेखक ,कथाकार व चित्रकार विद्यार्थी कुमारी अंजली तांबे ,कुमार प्रसाद तांबे, कुमार आदर्श निकाळजे,कुमार रोहित तांबे, कुमारी गौरी तांबे,चित्रकार कु. भक्ती तांबे यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्यात आली. याप्रसंगी प्रशालेतर्फे श्री खेडकर सर , श्री संत सर डोणगाव तांड्याची मुख्याध्यापक श्री पवार सर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रणधीर पठारे सर ,प्रास्ताविक श्री. मुंडे सर तर कवी श्री धीरज पराये सर यांनी आपल्या कविता सादर केल्या. श्री अन्नदाते सर यांनी आपले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक श्री रमेश मुळे सर यांनी केला तर आभार प्रदर्शन श्री आसिफ भाई शेख सर यांनी केले.