संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
१४ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त नर्मदा कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात सामूहिक पसायदान गायनाचा भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाची शोभा संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री विलास जाधव साहेब हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून संत साहित्य हे समाजातील ऐक्य, प्रामाणिकपणा आणि सद्भावना वाढविणारे अमूल्य द्योतक असल्याचे प्रतिपादन केले. संस्थेच्या सचिव सन्माननीय सौ. कविता जाधव यांनी विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांचा आध्यात्मिक वारसा जतन करण्याचे आवाहन केले.
प्रमुख व्याख्याते हरिभक्त परायण स्वर सम्राट नामदेव महाराज पोकळे यांनी संतवाङ्मयातील जीवनदृष्टी व समाजप्रबोधनाचा संदेश स्पष्ट केला, तर हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कोल्हे यांनी संतांच्या साधेपणा, लोकहित व आत्मशुद्धीच्या संदेशाने उपस्थितांना प्रेरित केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संदीप काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. चेतन गर्जे यांनी ओघवत्या शब्दांत केले तर आभार प्रदर्शन प्रा. साईनाथ भिसे यांनी मानले.
या कार्यक्रमास प्राध्यापक उद्धव ताठे, प्रा. चंद्रशेखर साळवे, प्रा. श्रीमती मनीषा पाचारणे, प्रा. श्रीमती स्वाती धुमाळ, कर्मचारी अजय सातपुते, उमेश जाधव तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सामूहिक पसायदान गायनादरम्यान परिसरात आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.