Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 26 July 2025 06:43 PM

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन

दखनी स्वराज्य वृत्तसेवा, छत्रपती संभाजीनगर 

जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालय, कांचनवाडी येथे आज दि. 26 जुलै रोजी कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने शहिद जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष सचिन खैरे तर प्रमुख पाहुणेपदी शाळेचे मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.हरी कोकरे, शिक्षण निदेशक माजी सैनिक दत्तात्रय लोखंडे, माजी सैनिक मनोहर परसे, राजू डोंगरदिवे, रामदास पठाडे, विश्वनाथ घुगे, एनसीसी विभाग प्रमुख अनिल जगताप उपस्थित होते.
 सर्वप्रथम कारगिल विजय दिनानिमित्त विजयी स्तंभास मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच सैनिकी शाळेच्या सैनिक विद्यार्थ्यांकडून विजय स्तंभास मानवंदना देण्यात आली.
 यावेळी कु.शिवराज कांबळे व स्वरीत अवसरमल या 11 वी. वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील यांनी कारगिल युद्धातील जवानांनी केलेली शौर्यगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडत शहीद जवानांना नमन केले. 
 कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन खैरे यांनी विद्यार्थ्यांना कारगिल विजयी दिनाच्या शुभेच्छा देत पुढील आयुष्यात सैन्य दलात दाखल होऊन देश सेवा करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हरी कोकरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैनिकी विभागाचे सर्व शिक्षण निदेशक, एनसीसी विभाग यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.