Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

डॉ अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कवीसंमेलन संपन्न

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 31 July 2025 11:42 PM

डॉ अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कवीसंमेलन संपन्न


दखनी स्वराज्य, प्रतिनिधी  - जगदीप वनशिव


 पुणे - येथील मातंग शक्ती युवा प्रतिष्ठान आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. मुख्य आयोजक  समाजभूषण पुरस्कार विजेते प्रा. गुलाबराव नेटके, सौ प्रियंका नेटके यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजित केले होते.
        या कार्यक्रमात शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कामगारांचा सन्मान द. स. पोळेकर (वृक्ष संवर्धन समिती मनपा पुणे) यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र  देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लेखक समाजसेवक शंकर तडाखे, प्रमुख पाहुणे भीमराव पाटोळे (पीएमटी चेअरमन मनपा पुणे), प्रास्तविक समाजभूषण प्रा. गुलाबराव नेटके यांनी केले.
उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन भारत धावरे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात शंकर तडाखे म्हणाले, "ज्या झाडाला फळे असतात त्या झाडाला दगड मारतात. गुलाबराव तुम्ही फळाचे झाड आहात."
 ज्येष्ठ समाजसेवक भीमराव पाटोळे, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहिर करावा असे आव्हान केले. सत्ताधारी यांची राजनैतिक जबाबदारी आहे. मिळेपर्यंत मी स्वस्त बसणार नाही असे प्रतिपादन केले.  द.स. पोळेकर म्हणाले, "संघर्ष, जिद्द, चिकाटी या असणाऱ्याला विरोध करतात. आम्ही गुलाबराव नेटके यांच्या बरोबर आहोत. पाटोळे, तडाखे, पोळेकर  हे तिघे जण मिळून साथ देणारी समाजाची निर्मिती करताना संघटन अति महत्त्वाच असत असा आशावाद व्यक्त केला."
     दुसरा सत्रामध्ये कवी संमेलनाच्या आयोजन करण्यात आले होते. कवी संमेलनाच्या अध्यक्ष प्रा.डॉ. उज्वला मोरे, प्रमुख पाहुणे लोककवी सिताराम नरके (राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी), डॉ. बळीराम  (दैनिक टोला संपादक), निमंत्रित कवी चंद्रकांत जोगदंड, गोपाळ कांबळे, प्रवीण लोखंडे, प्रा.बाबासाहेब जाधव, दशरथ दुनघव, सुनील हनवते, आनंद गायकवाड, छगन वाघचौरे, आशा दाते, जना बापू पुणेकर, प्रा.संभाजी चौगुले, विजय जाधव, अश्विनी चेन्नूर, प्रा.आनंद महाजन, संदिपान पवार, बालव्याख्याता शुभम नेटके या सर्वांनी विविध प्रकारच्या रचना सादर करून रसिकांची मने जिंकली. प्रेमगीत, छक्कड, मुक्त छंद, वैचारिक, मार्मिक, समाज प्रबोधन करणाऱ्या रचना सादर झाल्या. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप यांनी शीघ्र चारोळ्या चुटकुले विनोद सादर करून कवी संमेलनात रंगत आणली. श्री भोसले सर यांनी आभार मानले. पुणे पर्वती लक्ष्मीनगर येथील लहुजी वस्ताद वाचनालयाच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.