संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आऊसाहेब सेवा प्रतिष्ठानच्या वतीने योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सहभागींचा पांढऱ्या पारंपरिक वेशभूषेतील शिस्तबद्ध सहभाग एकात्मतेचे प्रतीक ठरला.
कार्यक्रमाचे नेतृत्व डॉ. दिव्या पाटील, संस्थापक अध्यक्ष, आऊसाहेब सेवा प्रतिष्ठान यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम, ताडासन, वज्रासन, सूर्यनमस्कार यांसारख्या विविध योगक्रियांचा सराव करण्यात आला. योगाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्य सशक्त करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमास फाइव स्टार इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल आशा तायडे, तसेच सुरेखा पावडे, सुजाता सोनकांबळे, लता साळवे, विजया कातकडे, रोहिणी हलगे, छाया मोगले, शकुंतला मटपती आणि प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. फाइव स्टार इंग्लिश स्कूलमध्येही योग दिन विशेष साजरा करण्यात आला.