संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
आय.एस.ओ. मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी तांडा नं-२, केंद्र पिसादेवी छत्रपती संभाजीनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी तांडा नं-२ येथे परिवर्तन जनसेवा फाऊंडेशन यांच्याकडून 100 वृक्ष भेट देण्यात आले.
श्री.उध्दव घुले व शरद घुले यांच्या शुभहस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री.उमेश दसपुते यांनी मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती गवई यांच्या मार्गदर्शनात हे वृक्षारोपण नियोजन केले होते. या कार्यात युवा प्रशिक्षणार्थी रेणुका शेळके यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.