Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

मानव एकता दिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 528 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 24 April 2025 09:04 PM

मानव एकता दिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 528 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान 

दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर,एप्रिल 24, 2025 :

प्रेम आणि बंधुभावना जागविणारा ‘मानव एकता दिवस’, संत निरंकारी मिशन द्वारे दरवर्षी 24 एप्रिल रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धा आणि भक्तिभावनेने परिपूर्ण वातावरणात आयोजित केला जातो. हा दिवस केवळ पुण्यस्मरण करण्याचा प्रसंग नसून मानवता, सौहार्द आणि एकत्वाच्या भावनांचा एक आत्मिक संगम आहे. 
मानव एकता दिवसाच्या या प्रसंगी मिशन कडून देशभर रक्तदानाच्या एका प्रेरक श्रृंखलेचा शुभारंभ होतो या वेळी *छत्रपती संभाजीनगर मधील सिंधी कॉलनी येथे झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये 528 दात्यांनी उत्साह आणि समर्पण भावनेने स्वेच्छा रक्तदान करुन मानवकल्याणामध्ये आपला सहयोग दिला. या शिबिराचे उद्घाटन पूर्व क्षेत्रीय संचालक हरिलाल नाथानी यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा संयोजक डी जी दळवी तसेच, बजाजनगर चे मुखी शिवाजी कुबडे, शाखा सिंधी कॉलनी चे मुखी सचिन अधाने यांची प्रमुख उपस्थिती होती.* संपूर्ण रक्तसंकलन हे शासकीय रक्तपेढी तर्फे करण्यात आले.*
युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांनी सत्यबोधाच्या माध्यमातून समाजाला समाज अंधश्रद्धा व अनिष्ठ प्रथांपासून मुक्त करुन नशमुक्ती, साधे विवाह आणि युवावर्गाला सकारात्मक विचारांशी जोडणे यांसारख्य लोककल्याणकारी अभियांनाची प्रेरक सुरवात केली. त्यांचे पावन मार्गदर्शन पुढे चालवत बाबा हरदेवसिंहजी यांनी “रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको” हा अमर संदेश देऊन रक्तदानाला मिशनच्या आध्यात्मिक सेवेचे अभिन्न अंग बनवले. हा संदेश आजदेखील प्रत्येक निरंकारी भक्ताच्या हृदयामध्ये सेवा आणि समर्पणाची प्रेरक ज्योत बनून तेवत आहे. 
आज सम्पूर्ण भारतभर आयोजित रक्तदान श्रृंखलेअंतर्गत सुमारे 30,000 यूनिट रक्त संकलित करण्यात आले.
हा दिवस चाचा प्रतापसिंहजी यांच्यासह त्या सर्व समर्पित बलिदानी संतांच्या पुण्य स्मृतिचे प्रतीक आहे, ज्यांनी मानव एकता, निःस्वार्थ सेवा आणि आध्यात्मिक जागृतीच्या मार्गावर चालत असताना आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. मानव एकता दिवस त्याच संतांचा दृढविश्वास व दृढसंकल्पाची प्रेरणा जीवंत करतो. 
हे महाअभियान केवळ रक्तदान नसून सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचा करुणा, सेवा आणि एकत्वाचा संदेश जीवनात उतरविण्याचे सजीव माध्यम आहे जे आम्हाला शिकवते, की मानवता हाच सर्वोच्च धर्म होय. याच प्रेरणेने युक्त संत निरंकारी मिशन, सेवा आणि समर्पणाच्या पथावर निरंतर मानवतेचा मार्ग प्रशस्त करत आहे.