संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पुणे - येथील सुगम गायन समुह यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त लोककवी सीताराम नरके यांना "नवरत्न पुरस्कार २०२५" समाजसेविका माया ताई प्रभुने, संस्थेच्या अध्यक्षा संगीत विशारद अर्चना भट सौ विजयाताई नरके यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याच कार्यक्रमात "श्री सत्यगुरु सेवा प्रतिष्ठाण" सातारा या संस्थेचा वतीने "जीवन आदर्श अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गुण गौरव पुरस्कार" हभप उमेश पतंगे महाराज, हभप सौ मोहीनी उमेश पतंगे आई महाराज व डॉ दिनकर निसाळकर यांच्या हस्ते देण्यात आला लोककवी सीताराम नरके यांचे मूळगाव तळेगाव ढमढेरे. वारकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण
केले. समाजसेवेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ते पोलीस दलात दाखल झाले. ३५ वर्ष पोलीस दलाची सेवा करुन ते सन २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाले पोलिस दलात असताना त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक बक्षिसे मिळाली आहेत. सन २०१२ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सन्मान चिन्ह मिळाले आहे. त्यांच्यातील कर्तृत्वाचा खरा सन्मान तेव्हा झाला जेंव्हा त्यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात आले.
लोककवी सीताराम नरके यांनी सेवानिवृत्ती नंतर स्वतःला साहित्याला वाहून घेतले. त्यांची ज्ञानाई फाऊंडेशन नावाची संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जवळपास साठ कवीसंमेलने घेतली. स्वतःच्या पेन्शन मधून सांस्कृतिक कार्यक्रमाचा खर्च करतात संस्थेमार्फत कलाकार व साहित्यिक यांना पुरस्कार देऊन नवोदितांना प्रेरणा दिली.
सीताराम नरके यांची आता पर्यन्त १२ पुस्तके प्रकाशीत झाली असून एक प्रातिनिधिक कविता संग्रह ज्ञानाई फाऊंडेशन तर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. "करू तयांना नमन" या त्यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या काव्य संग्रहाचे प्रकाशन भारताचे माजी कायदामंत्री मा. रमाकांत खलप यांच्या शुभहस्ते दुबई येथे करण्यात आले होते.
पोलीस खात्यात असताना अनेक शासकीय कार्यक्रमाचे त्यांनी सूत्रसंचालन केले असुन या माध्यमातून सेवानिवृत्ती नंतरही पोलीस खात्याशी त्यांची नाळ जुळलेली आहे.
लोककवी सीताराम नरके यांची अनेक गीते यूट्युब चॅनलवर गाजत आहेत. त्यांनी पाच नाटकामधुन भूमीका केल्या असून "यारी" आणि "पुस्तक बंद" या मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. पुस्तक बंद या मराठी चित्रपटासाठी प्रेम गीत लिहून गीतकार म्हणून त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आहे.
ऑन लाईन मॅरेज, लग्नाची वरात, यंदा कर्तव्य आहे, नादच खुळा आणि माझी बायको माझी मेव्हणी या लघुपटात भूमिका केल्या आहेत इंद्रधनुष्य, अमृतकलश आणि सलाम वर्दी या आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांनी प्रमुख सहभाग नोंदवला आहे अनेक कवी संमलनाचे अध्यक्ष व साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे असे त्यांच्या नावा भोवती वलय निर्माण केले आहे.
अनेक सामाजिक संस्थानी त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव केला आहे आता मिळालेल्या या दोन पुरस्कारांनी त्यांच्या पुरस्कार वैभववात भर घातली आहे बहुआयामी व्यक्तिमत्व
असलेल्या लोककवी सीताराम नरके यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.