संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पाथर्डी तालुक्यातील हातराळ सैदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वामी विवेकानंद युवा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजीराव बडे यांना राज्यस्तरीय भारतीय समाज रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणार आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा प्रतिष्ठेचा पुरस्कारा दिला जात आहे. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्री बडे यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यसनाधिनता कमी करण्यासाठी व्यसनमुक्ती अभियान, प्लॅस्टिक बंदी निर्मूलन अभियान, राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा चांगल्या प्रकारे चालू राहण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती अभियान, झाडे लावा झाडे जगवा, राष्ट्रीय एकात्मता अभियान, स्त्रीभ्रूणहत्या कमी करण्यासाठी लेक वाचवा लेक शिकवा अभियानाद्वारे मुलींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात आला.
ज्यांची पाल्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतील त्या सर्वांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची अनोखी संकल्पना यांनी राज्यातील ग्रामपंचायतींना दिली. शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात आपल्या कर्तुत्वाचा ठसा त्यांनी उमटविला. एक गाव एक गणपती, शिवजयंती निमित्ताने संतांचे व्याख्याने यशस्वी राबविली. एक वृक्ष माँ के नाम अभियान राबविले.