संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
आज, दिनांक 21 जून, 2025 रोजी श्री संत सावता गुरुकुल विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री संत सावता गुरुकुल प्राथमिक, माध्यमिक तसेच ,श्री संत सावता ग्रामीण महाविद्यालय- क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने आज सावता संकुलामध्ये योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सकाळी 7:00 ते 9:00 पर्यंत झालेल्या या शिबिरासाठी योग शिक्षक म्हणून श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख संदीप जगताप तसेच योग शिक्षिका मंजुश्री पवार यांनी योगाचे प्रात्यक्षिक सर्वांकडून करून घेतले . योगा हा शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतो याविषयी प्रथम त्यांनी उदबोधन केले . योग प्रात्यक्षिकानंतर त्यांनी प्राणायाम घेतले . या शिबिराचे उदघाटन श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष टकले, श्री संत सावता गुरुकुल प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आप्पासाहेब चव्हाण, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना उरणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले . या शिबिरासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक गुरुकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . एकूण 650 विद्यार्थी व शिक्षकांचा या शिबिरात सहभाग होता. या सर्व कार्यक्रमासाठी गुरुकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.