संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
येथील शिवाजी महाविद्यालय कन्नड येथे 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' पंधरवाडा अभियानाचा प्रारंभ सामूहिक वाचन व भव्य ग्रंथ प्रदर्शनाने करण्यात आला.सामुहिक वाचन उपक्रमात ( ता. ३ ) कला,वाणिज्य,विज्ञान, बी.सी. ए.,बि. सी.एस.शाखेच्या मिळून 1000 विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन केले.याप्रसंगी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय भोसले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या करिता विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन साहित्य वाचावे असे आव्हान केले. तसेच वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमात या पंधरवड्यात दररोज आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली व सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले यासाठी विविध कार्यक्रमांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ दोन असे पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सामूहिक वाचनासाठी सहभागी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची पुस्तके ग्रंथालयातून उपलब्ध करून देण्यात आली. पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकाचा सारांश विद्यार्थी 500 शब्दात लिहून सादर करणार आहेत.
सामूहिक वाचनानंतर ग्रंथातील दुर्मिळ व प्रसिद्ध पुस्तकांचे भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवयित्री साहित्यिक डॉ. प्रतिभा अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ. प्रतिभा अहिरे यांनी विविध ग्रंथाविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व फायदे सांगितले.वाचन कट्टा हा उपक्रम ग्रंथालयामार्फत सुरू करण्यात आला. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमासाठी समिती प्राचार्य डॉ. विजय भोसले, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब मगर,ग्रंथपाल प्रा.संतोष देशमुख, डॉ. शिवाजी हुसे, डॉ.गोविंद बुरसे, डॉ.रामचंद्र झाडे, डॉ. अलका गडकरी, डॉ.विजय मातकर, प्रा. अशोक भोसीकर डॉ. प्रतिभा अहिरे डॉ. प्रकाश खेत्री, डॉ.उदय डोंगरे डॉ.राकेश अहिरराव डॉ. प्रकाश महाजन तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल क्षिरसागर व सर्व प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल संतोष देशमुख, सूत्रसंचालन डॉ. रामचंद्र झाडे , आभार डॉ. राकेश अहिरराव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समिती सदस्य मंडळ तसेच सर्व प्राध्यापक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी एनसीसी कॅडेट व एनएसएस स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.