संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
विंचेस्टर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याच वेळी इन्व्हेस्टीट्यूचर सेरेमनी (पदव्युत्तर समारंभ) देखील पार पडली.
या कार्यक्रमास "आऊसाहेब सेवा प्रतिष्ठान"च्या संस्थापक अध्यक्षा आणि "आपुलकी वस्तीगृह"च्या संचालिका डॉ. दिव्या पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना टिळकांचे आदर्श आत्मसात करण्याचे आवाहन केले.
या समारंभात १२८ विद्यार्थी नेत्यांना सन्मानपूर्वक बॅज प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टिळकांच्या विचारांवर प्रभावी भाषणे सादर केली. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांच्या शपथविधीने करण्यात आला.